माझी गोष्ट - ५
माई स्टोरी part ५
बक्कळ पैसा कमावणे हे माझे कधीच ध्येय नव्हते, आता पण नाही.
जगात सर्वांत श्रीमंत आणि सुखी कोण आहे?
माझ्या मते
१. ज्याला १ रुपयाचे पण कर्ज नाही
२. आणि जो निरोगी आहे व तब्येतीच्या काहीच तक्रारी नसणारा
बास, बाकी काहीच मॅटर करत नाही कि तुम्ही काय पापे करता आणि किती पैसे कमावता ते!
(तुमचे विचार पण मला सांगू शकता यावर)
हॉस्पिटलमधून discharge मिळाला, मस्त १३-१५ लाखाचे बिल लागले, पण जान बची लाखो पाये असा म्हणून नेक्स्ट वीक flight बुक केली.
एव्हाना नॉनव्हेग चालू केल्यामुळे, क्लायंट ने मला मस्त मस्त प्राणी खायला घातले जवळपास १५-१७ प्रकारचे प्राणी हाणले मी - निम्मे तर कळतं पण नव्हते काय होते ते! भारतातून निघताना माझे वजन जवळपास ६७kg होते - एका महिन्यात ते ७७-८० किलो च्या घरात पोचले!
त्या देशात मस्त पद्धत आहे - हॉटेलच्या एंट्रीलाच छोटासा zoo / aquarium असतो - त्यात बरेच प्राणी पोहत / चालत असतात - आपण आपल्याला पाहिजे तो चूझ करायचा - जाम फाटली होती माझी - शेवटी क्लायंटला सांगितले - अरे बाबा असलं नको सांगू मला करायला - बामनाचा हाये मी - मी डायरेक्ट आत जाऊन बसायचो - बाकी तो सांभाळायचा!
जवळपास १ महिना त्या देशात असल्यामुळे मी बराच मार्केटचा अभ्यास करून आणि क्लायंट च्या रेफेरेंस ने अजून clients जोडले., इकडे भारतातला बिझनेस जाम मंदावला होता - माझ्या अनुपस्थितीत बरेच मॅटर झाले होते - होईल सगळं ठीक म्हणून मी निघालो -.
इथून भारतात पोचण्याचा २४ तासातला अनुभव अविस्मरणीय होता..
सकाळी चहा आणि ब्रेकफास्ट हॉंगकॉंग देशात केला,
दुपारचे जेवण सिंगापोर देशात,
रात्रीचे जेवण हैदराबाद आणि पहाटेचा चहा आपल्या मुंबईत!
क्रमशः
(मी खूप बढाया मारतोय असे वाटत असेल तर क्षमस्व)