माझी गोष्ट - ४

July 7, 2025

माई स्टोरी part 4

फुलटाईम business चालू झाला माझा - सुरुवातीला माझ्या ज्या मित्रांना जॉब लागले नव्हते त्यांना घेऊन काम चालू केले,

एकट्याने धंदा करणे आणि स्टाफ ठेऊन धंदा करणे यात खूप फरक असतो, महिन्याच्या महिन्याला जेंव्हा ऑफिस भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार व इतर खर्च द्यायची वेळ येते तेंव्हा तिथेच लागते ९०% लोकांची, माणूस कितीपण धाडसी असो व हुशार असो - पैशाचं सोंग घेता येत नाही!

असा वाटायचं कि का सोडला मी जॉब आणि हे डोक्याला ताप करून बसलोय, पण हळूहळू स्थिरस्थावर होत गेले आणि सर्व कर्मचाऱ्यांचे पगार, खर्च भागवून थोडेबहोत पैसे येऊ लागले - ८-९ जणांचा स्टाफ झाला एव्हाना.

हळूहळू तुमच्या वहिनीला आणि तिच्या घरच्यांनाही कॉन्फिडन्स येत होता, तिने मला सुरवातीला एक वर्षाचा टाइम दिला पण सर्व सुरळीत होण्यास दोन एक वर्षे लागली..

मध्ये एकदा नवा, सावत्या आले होते पुण्याला - पार्टी झाली आणि मस्त गप्पा झाल्या होत्या - त्यांना लक्षात आहे का माहित नाही! रुपाली मॅडम ला पण भेटलो होतो एकदा, त्या रत्नागिरीहून नंदुरबारला जाताना मध्ये काही कामासाठी पुण्याला थोडावेळ होत्या तेंव्हा गेलो होतो बस स्टॅन्ड वर!

२०१५ - ऑगस्ट मध्ये एंगेजमेंट झाली - माझे काही खूप काही भारी चालू नव्हते फक्त उपाशी नव्हतो तेवढेच - आपलं जेमतेम खर्च भागवून निवांत चालू होत.

काही दिवसानंतर...

पुण्यात नेहमीप्रमाणे पावसाळ्यात सर्दी खोकल्याची साथ चालू होती, माझेही नेहमीप्रमाणे काम चालू होते - एकेदिवशी रात्री १०-११ वाजता काम करत असताना अचानक माझ्या क्लायंट च्या सॉफ्टवेअर ला प्रॉब्लेम आला आणि त्याने मला ताबडतोब हॉंगलॉंगला बोलावले, urgent मध्ये तिकीट बुक करून सकाळी ६ ची flight मुंबईहून पकडण्यासाठी मी निघालो, कोणालाही फोन करायला मिळाला नाही - तातडीने हॉन्गकॉन्गला पोहोचलो,

रात्री clientsobat मीटिंग घेऊन प्रॉब्लेम solve केला, आणि आलोच आहे हॉंगकॉंगला तर काही दिवस फिरून घ्यावे म्हणून थांबलो, हॉंगकॉंग, मकाऊ हे देश मी मस्त फिरून घेतले आठवडाभरत - अधून मधून मला ताप येत होती पण काही मेडिकल च्या जेनेरल गोळ्या घेतल्या कि राहत होती..

पण एकेदिवशी काही करून ताप उतरेना माझा, खूप असह्य झाल्यावर क्लायंट ने मला हॉस्पिटलला घेऊन गेला - रस्त्यातच बेशुद्ध पडलो मी...

व्यवस्थित शुद्धीत येण्यास १ - १.५ दिवस लागले - इकडे घराचे माझा फोन लागेना म्हून त्यांना वेड लागायची पाली अली होती, होणारी बायको पण खूप टेन्शन मध्ये होती - सगळ्याचे म्हणणे होते कि काहीही कर आणि ये बाबा घरी...

तपासणीचे रिपोर्ट आले आणि मला टायफॉईड असल्याचे निदान झाले, भारतात टायफॉईड झाला तरी गोळ्या इंजेकश देऊन patient ला घरी जाऊ देतात, पण हा प्रगत देश - त्या देशात टायफॉईडचा रुग्ण आढळणे म्हणजे एक्दम रेअर गोष्ट.

मला तिथे isolation रूम मध्ये ठेवले गेले एकट्याला - जवळपास १ महिना त्या रूम मध्ये एकटा होतो मी - माझा फोन, लॅपटॉप आणि TV एवढच त्या रूम मध्ये. जोपर्यंत मी १००% बरा होत नाही तोपर्यंत discharge नाही, आणि कोणाला भेटायची परमिशन पण नाही. त्याकाळात माझ्या आईवडिलांची अवस्थेची कल्पना मला आजही करवत नाही - एकुलतं एक पोरग बाहेरदेशात जातो काय - आजारी पडून अडकून पडतो काय - गजबच!

मग त्यांनी मला त्यांच्या मेडिकल स्टुडंट्स साठी केस स्टडी म्हणून दाखवायला सुरुवात केली, एक दोन दिवसाला chinese मेडिकल स्टुडंट्स यायची आणि मला तपासायची आणि शॉर्ट lecture घायची - अगदी मुन्नाभाई MBBS मधल्या scene सारखं...

मी त्यावेळी शाकाहारी असल्यामुळे मला नेमकं खायला काय द्यावं हा प्रॉब्लेम होता - तो देश ९९% मांसाहारी आहे - मला vegchya नावाखाली सॅलड, साधा भात असे चालू होते - पण तब्येत लौकर सुधरावी म्हणून क्लायंट ने तात्पुरतं चालू करण्याचा सल्ला दिला - मलाही लौकर मातृभूमीला जायचं होत म्हणून मी दाबून nonveg चालू केले.

क्रमशः

Amit Kulkarni