माझी गोष्ट - ३
माई स्टोरी part 3
१०० रु मध्ये फुल्ल कॉम्पुटर रिपेअर ची मी scheme चालू केली आणि कौलेज करत करत business पण करत गेलो,
कौलेज मध्ये फुल्ल जिंदगी जगली, धमाल मस्ती, ट्रिप्स - माझा syllabus ऑलरेडी कव्हर झाल्यामुळे मी निवांत होतो, पण हे बाकीच्यांना माहित नसल्यामुळे ते confuse व्हायचे,
तुमची होणारी वहिनी पण होती माझ्याच वर्गात, सुरुवातीला तिच्या मनात होती खुन्नस, पण luckily एका पाठोपाठ रोल no. आल्यामुळे काही महिन्यात मिटली तिची खुन्नस!, आम्ही चांगले मित्र झालो - पूर्ण कौलेज ची ३ वर्ष झाल्यानंतर मी तिला प्रोपोस केलं, पण "आमचं हाय" हे गावभर माहित होत - पण आम्ही directly बोललो नाहीत कधी यावर - कारण मला करिअर वर फोकस करायचा होता - प्रेम २nd priority - नसत्या माकडचाळ्यात पडलो असतो तर बरबाद झालो असतो.
मधल्या काळात स्वतःला upgrade करून रिपेरिंग सोबतच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट - वेबसाईट ची कामे चालू केली मी - छोटासा का होईना पण parallel business कॉलेज करता करता चालू होता...
कॉलेज च्या शेवटच्या वर्षात फायनल परीक्षेच्या अगोदर कॅम्पस interview असतात, त्यात मी इन्फोसिस, techmahindra, विप्रो, L & T अश्या ४-५ companies मध्ये सिलेक्ट झालो - option भरपूर होते माझ्याकडे - पण जवळपास सर्वांना मुंबई / बंगलोर ला शिफ्ट व्हावे लागत होते म्हणून मी - इतक्या दिवसात पुण्यावर प्रेम झाल्यामुळे techmahindra निवडलं. :-)
वहिनी कुठेच सिलेक्ट होत नव्हती - त्यामुळे तिचा जरा कॉन्फिडन्स डाउन झाला होता - विप्रो चा पहिला राऊंड आमच्या कॉलेज मध्ये होता, तेंव्हा लॅबमधला कॉम्पुटर हॅक करून मी तिला तो राऊंड क्लिअर करून दिला - मग पुढचे राऊंड्स ती स्वतः क्लिअर झाली - आणि तिला मुंबई सिलेक्ट करावं लागलं - ऑपशनच नव्हता तिच्याकडे :-(
आम्हा दोघांनाही BITS Pilani ची MS scholarship मिळाली कंपनीकडून - पुढील शिक्षणाचा खर्च कंपनी करणार - काम करता करता डिग्री आणि व्यवस्थित पगार - कंपनीची अट एकच होती कि कमीत कमी ४ वर्ष त्याच कंपनीत काम करायचं, नाहीतर ३ Lakh दंड आणि ब्लॅकलिस्ट!
मग आमची मुंबई - पुणे - मुंबई लव्ह स्टोरी सुरु झाली!
२०१२ - माझा जॉब मस्त चालू झाला - भारी वाटलं पूर्णपणे स्वावलंबी होऊन - IT मध्ये जास्त काम नसत - दगदग पण नाही - रिलॅक्स झालो काहीदिवस - लंडन चा प्रोजेक्ट होता - फार काम नव्हतं - सर्व सेट झालं - डिग्री पण चालू side बाय side - छान छान गर्लफ्रेंड - त्यामुळे आयुष्यात तक्रार करायला जागाच नाही!
कंपनी पण भारी होती - पाहिजे त्या विषयातले कोर्सेस - knowledge, library - फुल्ल सपोर्ट. - फ्री!
पण हे राम! माझ्या डोक्यातला रेशमी किडा पुन्हा वळवळला!!!!
मी जे काम करत होतो ते तसे पाहायला गेले कर काही विशेष खास नव्हते - हळू हळू माझा इंटरेस्ट निघून गेला त्यातला - माझ्या क्षमतेला तोड देणारे - challenging नव्हते काम - खूप energy waste जात होती माझी - कारण ती कुठे कामाला येत नव्हती..
रुटीन जिंदगीचा कंटाळा आला होता मला - भारी ऑफिस- नेहमीच्या टिपिकल parties - रेगुलर पगार - मला मशीन बनवतं होते - खुश नव्हतो मी त्यात...
मग माझ्या डोक्यात वीज चमकली कि - साला मला काय प्रॉब्लेम आहे - मी का काहीबाही कारण स्वतःलाच सांगून स्वतःच्या भविष्याला बंदिस्त करून ठेवतोय? कशाची भीती आहे मला? - का मी माझ्या स्वतःशीच अप्रामाणिक राहतोय?
जे होईल ते होईल मान्यं आहे मला - असं ठरवून -- जॉब सोडला मी! पण कॉन्ट्रॅक्ट तोडल्यामुळे ब्लॅकलिस्ट झालो वर ३ लाखाचे देणे पण लागले आणि MS स्कॉलरशिप पण गेली!
इकडे होणारी वाहिनी पण कडाडली - नातं संपल्यात जमा होत - कारण तिच्या घरचेही लग्नाला मागे लागले होते - आणि ती माझ्या भरवश्यावर बसली होती - पण मी जॉब सोडून साधा business करावा हे तिला पचल नव्हतं - तिला कॉर्पोरेट culture मानवल होत - जास्त टेन्शन नाही डोक्याला आणि बिन्धात जिंदगी - यामुळे तिला माझी रिस्क घायची नव्हती.
मला जे वाटेल ते करण्यापेक्षा - पैसा - नोकरी - लग्न - घर यावर फोकस करावे असे सगळ्यांचे मत होते.
बरीचशी लोक आपल्या सुप्त इच्छा मारून केवळ पैसा, स्टेटस, प्रॉपर्टी, दिखावा साठी जगतायत आणि हेच मूळ सत्य आहे हे पाहून अस्वस्थ झालो होतो.
लोक काय म्हणतील हे तुमचं मन काय म्हणताय यापेक्षा वरचढ ठरतंय - अरे पण कामून?
मुलींचं एक बर असत राव - करिअर केलं काय नाही केलं काय - बॅकअप प्लॅन म्हणून मस्त नवरा शोधून लग्न करायचं - सर्व प्रॉब्लेम्सला एकाच answer - लग्न! मुलांचं तस नाहीये हो - त्यांना कर्तृत्व दाखवावंच लागत - नाहीतर कुत्रपण विचारत नाही!
स्त्रीचे सौंदर्य हे तिचे कर्तृत्व असते तर मुलाचे कर्तृत्व हे त्याचे सौंदर्य असते...
लग्न तर घंटा कोण करणार नाही - सरळ झोळी लेके हिमालयात जावे लागते!
क्रमशः