माझी गोष्ट - २

July 9, 2025

d.ed. चं एक वर्ष मला करिअरला २ वर्षे लेट करून गेले .. ( oct ते oct )..

पुण्याला आलो ऍडमिशन साठी

त्यावेळी bcs ला पण प्रत्येक कॉलेज entrance घेत होते, पण माझे १२वि चा score पाहून मला स्पॉट ऍडमिशन मिळाले.

ऍडमिशन घेताना त्या हॉल मध्ये ३-४ मुलं मुलीं waiting ला बसले होते, मी पण बसलो वैटिंग करत - सहज शेजारील डेस्कवर एक मार्कशीट होती ती पाहिली आणि सहज म्हणालो:

"मॅडम, लै कमी मार्क मिळाले हो तुम्हाला Biology त"

त्या पोरीने असे डोळे वटारून मला पाहिले की बस्स, रागाने बघून फुणकारात निघून जाऊन बसली दुसरीकडे जाऊन.

आता माझे काय चुकले यात?

d.ed. ला असताना सगळ्यांना मॅडम मॅडम म्हणायची - अहो जावो करायची सवय लागली आपल्याला - आदर नि निस्वार्थ प्रेम होत त्यात, त्या नुकत्याच १२ वि झालेल्या कोवळ्या पोरीला मॅडम म्हटल्याचा राग आला असावा बहुतेक - त्यात मी सहज मार्क विचारले तर राग काय यायची गरज होती? च्या आयला - मी बोलतो एक आणि पोरींना वेगळच ऐकू जाते बहुतेक - याचा अनुभव आला होता पूर्वी - त्यामुळे यावेळी काय मी गपगुमान परत काही बोलायला गेलो नाही - आपल्याला काय - आपलं काम बरं आणि करिअर.

हीच पोरगी नंतर तुमची वहिनी झाली हे वेगळं सांगायला नको - तुमचा भाई सोडतो व्हय हिला!

अधून मधून रत्नागिरीला येणे जाणे चालू होते - रत्नागिरीला असताना माझा एक रिवाज होता - रोज रात्री मांडावी बीचवर - पुलाच्या शेवटच्या टोकावर जाऊन सुसु करायची! - अजूनही जेंव्हा केंव्हा रत्नागिरीला जातो तेंव्हा हा रिवाज जरूर पाळतो मी ..

तुमच्या sendoff ला आलो होतो मी नव्या d.ed. कॉलेजात - शेवटी माझे पहिले कॉलेज होते ते!

इकडे माझं graduation आणि कॉम्पुटर रिपेरिंग पण चालू झालं पुण्यात ..

या नंतर भेटू आपण hongkongla!

क्रमशः

Amit Kulkarni