माझी गोष्ट - १

July 7, 2025

मला १२ वि cet ला कमी मार्क पडल्यामुळे आणि वडील शिक्षक असल्यामुळे फोर्सफुल्ली D.Ed. ला यावं लागलं, घरातला राग म्हणून माझ्याच तालुक्यातील कॉलेज सोडून मी एकदम दूर रत्नागिरी निवडलं.

सुरुवातीला मी खूप प्रयत्न केला जे आहे ते accept करण्याचा आणि एक आदर्श शिक्षक होण्याचं, पण मन नव्हतं लागत...

तुम्हाला तर माहितीच आहे, timepass करणे, बंक मारणे सुरु होते - फालतुगिरी जोरात होती माझी चालू.

Turning पॉईंट आला तो - पहिल्या वर्षाच्या शेवटी -

आपल्या सर्वांना डायरेक्ट शाळेवर जाऊन तास घ्यायला लावले तेव्हा,

एका पिरियड ला सलगर सरला तासाच्या सुरवातीला तपासणीपुस्तिका दयायची विसरलो मी, तासाच्या शेवटी आठवलं तर सलगर सर रागावून निघून गेले माझ्या तपासणीपुस्तिकेवर सही न करताच,

दुसऱ्या तासाला होता विषय गणित, ती लहान लहान मुले खूप छान बोलत होती, सांगत होती मी डॉक्टर बनणार, इंजिनीअर बनणार, त्यांची energy अप्रतिम होती - कणभर पण अविश्वास किंवा भीती नव्हती त्यांच्या मनात भविष्याबद्दल...

मग माझ्या डोक्यात वीज चमकली कि - साला मग मला काय प्रॉब्लेम आहे - मी का काहीबाही कारण स्वतःलाच सांगून स्वतःच्या भविष्याला बंदिस्त करून ठेवतोय? कशाची भीती आहे मला? - का मी माझ्या स्वतःशीच अप्रामाणिक राहतोय?

जे होईल ते होईल मान्य आहे मला - असं ठरवून सरळ दुसऱ्या दिवशी प्राचार्या कडे गेलो आणि म्हणले मला माझं ऍडमिशन कॅन्सल करायचंय - त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला मला - शेवटी माझ्या घरी फोन लावला - घरच्यांनी पण मला घाबरवण्यासाठी धमकी दिली कि तुला monthly पैसे नाही पाठवणार.

बॉम्ब तर फोडला होता - कोठल्याही परिस्थितीत माघार तर घ्यायची नाही ठरवले होते - पण काय करायचे होते ते पण माहित नव्हते. totally clueless - माझा इंटरेस्ट कॉम्पुटर मध्ये आहे हे मला त्यावेळी माहित नव्हतं!

मग एका मित्राच्या मदतीने एका सायबर कॅफेअर ७०० रु नोकरीवर रुजू झालो - काम होत कि लोकांच्या नोंदी ठेवायच्या आणि १ टाइम झाडू पोछा मारायचा - संध्याकाळी ६-११ पर्यंत.

रात्री ११ नंतर शटर खाली घेऊन मी इंटरनेट पाहायला लागलो - सापडू लागलो माझा इंटरेस्ट - काय करता येऊ शकते पाहू लागलो मिन बजेटमध्ये.

online aptitude टेस्ट्स घेऊन त्याचे analysis करून फील्ड लिस्ट काढली तर कॉम्पुटर फील्ड टॉप वर होते - कदाचित माझे math जरा बरे असल्यामुळे.

मग मी मिन बजेट कॉम्पुटर graduation फील्ड निवडले BCS - पुणे विद्यापीठाचा syllabus काढला तीन वर्षाचा आणि ऍडमिशन घ्यायच्या आधीच पूर्ण केला स्वतः तयारीने, कारण पुढे नापास झालेलं किंवा वर्ष गेलेलं परवडणार नव्हतं.

backupla हार्डवेअर आणि नेटवर्किंग चा कोर्से करून कॉम्पुटर दुरुस्तीची कामे पण चालू केली रत्नागिरीत.

अधून मधून येणे जाणे भेटणे चालू होते तुमच्या सर्वशी, पण पौगंडावस्थेतील एका माझ्या चुकीतून गैरसमजामुळे प्रॉब्लम झाला म्हणून मग मी सुरक्षितच अंतर ठेवलं मग. जो हुआ अच्छा हुआ - it helped focusing on my career 🤗

यानंतर भेटू आपण पुण्याला!

क्रमशः

Amit Kulkarni